शिंदेगट आधी बाप पळवत होता, आता मुलंही पळवायला लागले!; संजय राऊत बरसले
Bhushan Desai Inter in Shivsena : शिवसेना ठाकरेगटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे पूत्र भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या या पक्ष प्रवेशावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : शिवसेना ठाकरेगटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे पूत्र भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरेगटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे. “सुभाष देसाई हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या मुलाचा शिवसेनेशी काही संबंध नाही. शिंदे गट आधी बाप पळवत होते. आता मुलं पळवत आहेत. त्यांची भरती कुचकामी आहे”, असं म्हणत संजय राऊत यांनी जोरदार निशाणा साधला आहे. “उदय सामंत सध्या मिंधे गटात आहेत. त्यांनी सुभाष देसाईंच्या चिरंजीवांवर आरोप केले होते. त्यांच्यावर चौकशीचे आदेश दिले होते. आता मुख्यमंत्र्यांनी वॅाशिंग मशीनमधून देसाईंच्या चिरंजीवांना स्वच्छ केलं काय?”, असंही राऊत म्हणालेत.
Published on: Mar 14, 2023 11:41 AM