एकनाथ शिंदे यांना सावरकरांचं कार्य माहिती नाही, ते कागद केवळ वाचतात; संजय राऊत यांचा घणाघात

| Updated on: Mar 28, 2023 | 10:03 AM

Sanjay Raut on Swatantryaveer Savarkar : सावरकर क्रांतिकारक होते. समाजसुधारक होते. त्यांनी देशासाठी त्याग केला. लढले. सावरकर आमच्यासाठी आदरस्थानी आहेत. आम्ही सावरकर जगतो आहोत, असं संजय राऊत म्हणाले आहेत. पाहा...

नवी दिल्ली : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सावकरांचा इतिहास तरी माहिती आहे का? जर त्यांना माहिती असेलच तर त्यांनी सांगावं सावरकर यांचा जन्म कुठं झाला?, हे सांगावं. त्यांनी देशासाठी केलेल्या त्यागाबद्दल त्यांनी बोलावं. फक्त दिलेला कागद वाचून दाखवू नये, असं संजय राऊत म्हणाले आहेत. सावरकर गौरव यात्रा काढणं हे राजकीय ढोंग आहे. सावरकरांना संघ परिवारानं कायम वाळीत टाकलं. आता त्यांच्याबद्दल बोलणं हे ढोंग आहे, असं राऊत म्हणालेत. ते राजधानी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधत होते.

Published on: Mar 28, 2023 10:02 AM
सत्तांतरासाठी 2019 पासूनच शिंदे-फडणवीस आणि माझ्यात 100-150 बैठका झाल्या; शिवसेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ज्यांनी देशात आणीबाणी लावली त्यांना उद्धव ठाकरेंचा पाठिंबा; मनसेचं टीकास्त्र