मनसेसोबतच्या युतीच्या चर्चांवर उद्धव ठाकरे काय म्हणाले? संजय राऊत स्पष्टच बोलले, “दोन भाऊ कधीही…”

| Updated on: Jul 07, 2023 | 3:56 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विश्वासू आणि मनसे नेते अभिजीत पानसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची गुरुवारी भेट घेतली. या भेटीनंतर मनसे-ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. संदीप देशपांडे यांनी आम्ही प्रस्ताव द्यायचा विषयच येत नाही, असं म्हणाले. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विश्वासू आणि मनसे नेते अभिजीत पानसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची गुरुवारी भेट घेतली. या भेटीनंतर मनसे-ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. अभिजीत पानसे हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याबाबतचा प्रस्ताव घेऊन संजय राऊतांना भेटल्याची चर्चा सुरू आहे. यावर संदीप देशपांडे यांनी आम्ही प्रस्ताव द्यायचा विषयच येत नाही, असं म्हणाले. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. संजय राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंशी बोलण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. ना उद्धव ठाकरेंना, ना राज ठाकरे यांना, दोघांनाही अशा कुठल्याही मध्यस्थाची गरज नाही. दोन भाऊ कधीही एकेमेकांशी बोलू शकतात. त्यासाठी कोणी आमच्याकडे येऊन बोलण्याची गरज नाही. फक्त एक फोन उचलायचा आहे आणि बोलायचं आहे, इतकंच अंतर आहे. या युतीच्या चर्चांबद्दल मी उद्धव ठाकरे यांच्याशी काल बोललो. त्यांना सविस्तर माहिती दिली.”

Published on: Jul 07, 2023 03:56 PM
“माझं राजकीय करिअर संपवण्याचा हा डाव नेमका कोणाचा?”, काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांवर पंकजा मुंडे आक्रमक
“उद्धव ठाकर यांच्यासोबत फक्त आदित्य ठाकरे, राऊत, अंधारे एवढेच राहतील”, भाजप नेत्याची टीका