शिवसेनेच्या शाखेवरून ठाण्यात राडा; संजय राऊत यांची पहिली आक्रमक प्रतिक्रिया, म्हणाले…
Sanjay Raut : खेडच्या सभेनंतर सर्वांच्या पायाखालच्या जमिनी हादरल्या आहेत. आमचा शिवसैनिक कुठेही मागे हटणार नाहीत, असं संजय राऊत म्हणालेत. पाहा सविस्तर...
मुंबई : ठाण्यात काल शिवसेना आणि ठाकरेगटामध्ये वाद झाला. शिवसेनेच्या शाखेच्या अधिकारावरून हा वाद झाला. यावादावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. “हा असा राडा ठाण्यातच सुरु आहे. कारण मिंधे गटाचं अस्तित्व फक्त ठाण्यापुरतंच मर्यादित आहे. हे स्वत:ला शिवसैनिक म्हणवून घेणाऱ्याचं काम नाही. सत्तेचा आणि पोलीसबळाचा गैरवापर होतोय. पोलिसांच्या आड हल्ले करु नका, समोर या… असं आव्हान त्यांनी शिवसेनेला दिलं आहे. हा राडा फक्त ठाण्यातच सुरु आहे. मात्र हेदेखील लवकरच संपेल, असंही राऊत म्हणालेत.
Published on: Mar 07, 2023 11:12 AM