“…म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात”; संजय राऊत यांचं मोठं विधान

| Updated on: Aug 08, 2023 | 12:53 PM

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना फोन करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. असं असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2023 | दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांना फोन करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. उद्धव ठाकरे यांच्या खासगीतील विधानानंतर राजकारणातून अनेक तर्क वितर्क काढले जात आहे. असं असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे भाऊ आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी दोन्ही भाऊ एकत्र येऊ शकतात.माझे या दोघांशीही चांगले सबंध आहेत. त्या विषयावर दोघे बोलत असताना बाकी कुणी बोलायची गरज नाही.” संजय राऊत यांच्या विधानानंतर चर्चांना उधाण आलं आहे.

Published on: Aug 08, 2023 12:53 PM
फुटीर नेत्यांच्या मतदारसंघात शरद पवार यांची तोफ धडाडणार; ‘येथून’ रणशिंग फुंकणार
‘राजू शेट्टी म्हणजे तो मी नव्हेच’, रविकांत तुपकर यांच्यावरून शेट्टी यांच्यावर कोणी केली टीका