उद्धव ठाकरे यांनी ‘करून दाखवलं’, पण तुम्ही कुणाला घाबरता? संजय राऊत यांचा शिंदे फडणवीस सरकारला सवाल
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भाजपचे काही नेते गर्जना करत होते. आता ते मंत्रिमंडळात आहेत. उद्धव ठाकरे यांनी तर मंत्रमंडळाच्या बैठकीत त्याचा निर्णय घेत करून दाखवले होते. पण, त्या मोठ्या गर्जना आता कुठे गेल्या
मुंबई : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भाजपचे काही नेते गर्जना करत होते. आता ते मंत्रिमंडळात आहेत. उद्धव ठाकरे यांनी तर मंत्रमंडळाच्या बैठकीत त्याचा निर्णय घेत करून दाखवले होते. पण, त्या मोठ्या गर्जना आता कुठे गेल्या असा टोला संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस यांना लगावला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला. तो केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला. तो केंद्राने मंजूर केला नाही. आता केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असताना तो निर्णय घेयासाकय अडचण आहे ? तो विषय आता का रखडला ? केंद्राने का रखडवून ठेवला आहे ? कोणाला घाबरता ? कोणता नियम, कोणता कायदा आडवा येत आहे असे सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केले आहेत. भाजपचे नेते ढोंगी असून निर्णय घेत नाही अशी टीकाही त्यांनी केली.