श्रीकांत शिंदे यांच्या प्रश्नावर संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दात सूचक प्रतिक्रिया, म्हणाले, ‘त्यांनाही हा…’
कल्याण लोकसभा मतदार संघातच लोकसभा निवडणुकीवरून ठिणगी पडल्याचे समोर येत आहे. तर येथे भाजप कायकर्ते सांगतील, तोच उमेदवार अशी भुमिका भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीवरून सर्वच पक्षांची मोर्चे बांधणी सुरू आहे. याचदरम्यान राज्यातील भाजप-शिवसेना युतीत मिठाचा खडा पडला आहे. कल्याण लोकसभा मतदार संघातच लोकसभा निवडणुकीवरून ठिणगी पडल्याचे समोर येत आहे. तर येथे भाजप कायकर्ते सांगतील, तोच उमेदवार अशी भुमिका भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यावरूनच आता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी थेट आपली नाराजी मी माझ्या पदाचा राजीनामा देतो असे म्हटलं होतं. त्यावरून ठाकरे गटाच्या संजय राऊतांनी श्रीकांत शिंदे व शिंदे गटाला टोला लगावला आहे. तर उद्धव ठाकरेंनी शिंदेपुत्राचे अर्थात श्रीकांत शिंदेंचे फाजील लाड केले असेही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर आता भाजपशी आमचा संबंध नाही. तर शिंदे भाजपशी गुलामीचं नातं निभावत आहेत. आमची 25 वर्षं त्यांच्याशी युती राहिली. पण भाजप सतत प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेशी जागा वाटपावरून संघर्ष करतो. आम्ही तो केला. आता त्यांना करू द्या. आता त्यांना कळेल की शिवसेना कोणत्या संघर्षातून जात होती. आम्ही भाजपाशी नातं का तोडलं याचा अनुभव त्यांना घेऊ द्या, असंही राऊत म्हणाले.