Sanjay Raut | महाराष्ट्रातील सरकार छत्रपती संभाजीराजेंच्या मतांशी सहमत : संजय राऊत
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांनी दिलेल्या इशाऱ्याबाबत राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे उत्तर दिलं. महाराष्ट्रातील प्रत्येक नेता संभाजी छत्रपती यांच्या मताशी सहमत आहे. त्यामुळे सर्व उठून मोदींकडे जाऊया. त्यात भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी असा विषय नाही. सर्वांनीच मोदींना भेटलं पाहिजे. कारण मोदींच्या हातीच आता हुकूमाची पानं आहेत. त्यांनीच ती टाकावी, असं राऊत म्हणाले.