आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्रं आले आहेत- संजय राऊत

| Updated on: Mar 23, 2022 | 1:01 PM

ठाकरे सरकारमध्ये सर्व काही अलबेल असल्याचं महाविकास आघाडीचे नेते उठताबसता सांगत असतात. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही महाविकास आघाडी मजबूत असल्याचं अनेकदा सांगितलं.

ठाकरे सरकारमध्ये सर्व काही अलबेल असल्याचं महाविकास आघाडीचे नेते उठताबसता सांगत असतात. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही महाविकास आघाडी मजबूत असल्याचं अनेकदा सांगितलं. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (shridhar patankar) यांच्यावर ईडीने (ed) कारवाई केल्यानंतर राऊत यांनी पहिल्यांदाच आघाडीतील मतभेदावर भाष्य केलं. ईडीच्या कारवायांनी सरकार अस्थिर होईल असं काही नाही. असं कधी सरकार अस्थिर होतं का? उलट सरकार अधिक मजबूत झालं. आमच्यात ज्या काही फटी पडल्याचं वाटत होतं, त्या फटी बुजल्या आहेत. आमच्यात मतभेद असल्याच्या काही ठिकाणी संशयाला जागा होत्या, त्या बुजल्या आहेत. या निमित्ताने आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्रं आले आहेत, अशी कबुली शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. टीव्ही9 मराठीशी एक्सक्ल्युझिव्ह संवाद साधताना राऊत यांनी ही कबुली दिली.

Published on: Mar 23, 2022 01:01 PM
दोन वर्षानंतर मनसेचा मुंबईत पाडवा मेळावा
मुंबईच्या महालक्ष्मी परिसरातील इमारतीला भीषण आग