राज ठाकरे-फडणवीस भेटीवर संजय राऊत याची खोचक प्रतिक्रिया म्हणाले, “ते उत्तम होस्ट”
शिवतीर्थ निवासस्थानी त्यांच्यात चर्चा झाली. यावरून अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. यावरूनच राज ठाकरे यांच्याशी अराजकीय गप्पा झाल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसेच आमचं ठरलं होतं की एक दिवस गप्पा मारायला बसू त्यामुळे भेट झाल्याचे ते म्हणाले.
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शिवतीर्थ निवासस्थानी त्यांच्यात चर्चा झाली. यावरून अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. यावरूनच राज ठाकरे यांच्याशी अराजकीय गप्पा झाल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसेच आमचं ठरलं होतं की एक दिवस गप्पा मारायला बसू त्यामुळे भेट झाल्याचे ते म्हणाले. यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. त्यांनी, राज ठाकरे उत्तम होस्ट आहेत, लोकांचे स्वागत चांगले करतात. हवं तर फडणवीस यांनी त्यांच्या घरी 8 दिवस राहायला जावं. देवेंद्र फडणवीस यांचीच काय अन्य कोणीही कुठेही कोणाचेही भेट घेतली. तरी देखील आम्हाला म्हणजे शिवसेनेवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.
Published on: May 30, 2023 03:35 PM