Video | ‘प्रकाश आंबेडकरकरांवर काही मायावतींसारखा…,’ काय म्हणाले संजय राऊत

| Updated on: Mar 04, 2024 | 12:55 PM

भाजपाने लोकसभेच्या तारखा जाहीर करण्याआधीच आपली पहिली 195 उमेदवारांची यादी जाहीर करुन लोकसभेच्या प्रचाराला सुरुवातही केली आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी त्यांच्या भारत जोडो न्याययात्रेत अडकून पडले आहेत. कदाचित यात्रेचा समारोप होण्याआधीच लोकसभेची आचारसंहिता होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्या नाराजीवर शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी महत्वाचे भाष्य केले आहे.

Follow us on

मुंबई | 4 मार्च 2024 :  एकीकडे भाजपाने लोकसभेच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच आपली 195 उमेदवारांची यादी जाहीर करीत देशात आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडी यांची मोट बांधण्याचे काम सुरुच आहे. महाराष्ट्रात येत्या 12 मार्चला राहुल गांधी यांच्या न्याययात्रा प्रवेश करीत आहे. कोणत्याही दिवशी लोकसभेच्या तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात अशी चिन्हं आहेत. त्यात महाविकास आघाडीचे जागा वाटप अजून चर्चेतच अडकून पडले आहे. प्रकाश आंबेडकर हे देशातील फॅसिस्ट शक्तींना ताकद मिळेल असा कोणताही निर्णय घेणार नाहीत. येत्या 6 तारखेला वंचित बहुजन आघाडीशी जागा संदर्भात चर्चा होणार असल्याचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा दलित, शोषित, आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणाची होती. परंतू मोदी यांच्यावर काही बोलत नाहीत. बाबासाहेबांचे नातू म्हणून प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय प्रवाहात राहतील. देशाच्या जनमाणसाचा अंदाज घेऊन इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यासोबत राहतील, वावगा निर्णय घेणार नाहीत. मायावतीप्रमाणे त्यांच्यावर भाजपाशी संधान केल्याचा ठपका नाही असेही राऊत यांनी म्हटले आहे.