“मणिपूरमध्ये भाजपची सत्ता नसती तर आतापर्यंत सरकार खतम केलं असतं”, संजय राऊत यांचं टीकास्त्र
मणिपूरच्या हिंसेवरून संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच राहुल गांधी हे फ्रस्टेड झाल्याची टीका सत्ताधाऱ्यांनी केली आहे, यावरही संजय राऊत यांनी त्यांचा समाचार घेतला.
मुंबई, 16 जुलै 2016 : मणिपूरच्या हिंसेवरून संजय राऊत यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. तसेच राहुल गांधी हे फ्रस्टेड झाल्याची टीका सत्ताधाऱ्यांनी केली आहे, यावरही संजय राऊत यांनी त्यांचा समाचार घेतला. “राहुल गांधी फ्रस्टेड नेते कसे असू शकतात? मणिपूर देशाचा हिस्सा आहे. तिथे हिंसाचार सुरू आहे. हा हिंसाचार थांबवण्यात केंद्र आणि राज्य सरकार अपयशी ठरले आहे. मणिपूरमध्ये भाजपची सत्ता नसती तर एव्हाना भाजपची भाषा बदललेली असती. तिथे राष्ट्रपती राजवट लावली असती. सरकार खतम केलं असतं. पण पंतप्रधानाने अजून त्यावर भाष्य केलं नाही. मणिपूरच्या हिंसेवर युरोपियन पार्लमेंटमध्ये चर्चा होते. विश्वाला चिंता आहे. पण विश्वगुरुला चिंता नाही. राहुल गांधी देशभर फिरले आहेत. आपल्याच देशात हिंसाचार होत असेल आणि आपल्या देशातील एक नेता त्यावर बोलत असेल तर त्यात नैराश्य कुठून आलं? नैराश्य आहे. पण सरकार काहीच बोलत नाही, त्याचं नैराश्य आहे”,असं संजय राऊत म्हणाले.