विठोबा माऊलीचा आशीर्वाद महाविकास आघाडी सरकारला, संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला
विठोबा माऊलीचा आशीर्वाद महाविकास आघाडी सरकारला आहे, असा टोला संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांना लगावला. Sanjay Raut Devendra Fadnavis
मुंबई: “देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला दिलेल्या इशाऱ्याने प्रत्यक्ष विठोबा माऊलीसुद्धा सावध झाली असेल. विठोबा माऊलीचा आशीर्वाद महाविकास आघाडी सरकारला आहे. माऊलीचा आशीर्वाद नसता तर हे सरकार आलंच नसतं. त्यांनी जर विठोबा माऊलीला साकडं घातलं असेल तर विठोबा माऊली पाहील ना. पण आज जनता कोरोना संकटात सापडली आहे. या काळात सरकार पाडणं, सरकार घालवणं, सरकार अस्थिर करणं या सगळ्यातून बाहेर आलं पाहिजे”, असं मत संजय राऊत यांनी मांडलं.