राज्यपालांनी 12 आमदारांची नियुक्ती केल्यास राजभवनात पेढे वाटू, संजय राऊतांचा टोला
राज्यपालांनी 12 आमदारांची नियुक्ती केल्यास राजभवनात पेढे वाटू, संजय राऊतांचा टोला
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विधानपरिषदेच्या 12 आमदरांच्या नियुक्तवीरुन राज्यपाल भगतसिहं कोश्यारीवर निशाणा साधला आहे. राज्यपालांनी 12 आमदारांची नियुक्ती केल्यास राजभवनात पेढे वाटू, असा टोला राऊत यांनी लगावला. राज्यपालांनी त्यांच्या पदाला शोभलं असं काम करावं, असं देखील संजय राऊत म्हणाले.