“आमचा भ्रष्टाचारावरून प्रश्न, त्यावर पंतप्रधान मोदी यांनी बोलाव” संजय राऊत यांची टीका
पंतप्रधान मोदी यांच्या भाषणावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. "मणिपूरमधला हिंसाचार थांबत नाही. मणिपूर हातातून जात आहे. त्यामुळे आमच्यावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरवर गप्प का?" असा सवाल राऊत यांनी केला आहे.
मुंबई : पंतप्रधान मोदी यांच्या भाषणावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. “मणिपूरमधला हिंसाचार थांबत नाही. मणिपूर हातातून जात आहे. त्यामुळे आमच्यावर बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरवर गप्प का?” असा सवाल राऊत यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले की, “,आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या मोदींनी संसदेत राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे का दिली नाहीत, संसदेचे कामकाज बंद पडले, तरी मोदी का गप्प होते. भ्रष्टाचाराला कोण समर्थन करतंय? दादा भुसे, राधाकृष्ण विखे पाटील, अब्दुल सत्तार, राहुल कुल, तानाजी सावंत, गुलाबराव पाटील यांच्या लाखोंचा, कोट्यवधींचा पाच मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे मी देवेंद्र फडणवीसांना पाठवले आहेत. ही तक्रार तुमच्यापर्यंतही पोहोचली आहे. म्हणजे भ्रष्टाचार करायचा असेल तर भाजपमध्ये येऊन करा असं ते म्हणतात.भ्रष्टाचार संपावा ही आमचीही इच्छा आहे. पण केवळ विरोधकांनाच टार्गेट करायचं हे चुकीचं आहे. त्यांच्यावर मोदी कधी बोलणार आहेत. आधी त्यांच्यावर बोला. मग आमच्यावर टीका करा. ”