Sanjay Raut : एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांचा शंभुराज देसाईंवर पलटवार
Sanjay Raut On Shambhuraj Desai : कुणाल कामरा प्रकरणावरून मंत्री शंभुराज देसाई यांनी केलेल्या थर्ड डिग्रीच्या वक्तव्यावर आता खासदार संजय राऊत यांनी पालटवार केला आहे.
कुणाल कामराला पोलिसांच्या थर्ड डिग्रीचा वापर करावा लागेल, असा इशारा शंभुराज देसाई यांनी दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या विडंबन गाण्यावरून शंभुराज देसाई आक्रमक झाले. त्यावर आता खासदार संजय राऊत यांनी शंभुराज देसाई यांच्यावर टीका केली आहे. राज्यात तालिबानी राज्य आहे का? अशी टीका यावेळी राऊत यांनी केली आहे.
थर्ड डिग्रीचा वापर करण्याच्या गोष्टी करतात म्हणजे राज्यात तालिबानी राज्य आहे. आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. जर कोणी तुम्हाला दुखवणारं वक्तव्य केलं असेल तर त्यासाठी कायदा आहे, कोर्ट आहे. पण आता जर एखादा मंत्री हा अशी थर्ड डिग्री देण्याची भाषा करत असेल तर याचा अर्थ राज्यात तालिबानी राज्य आहे, असा पालटवार खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
Published on: Mar 28, 2025 12:21 PM