देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले संजय राऊत

| Updated on: Nov 03, 2024 | 2:29 PM

एकनाथ शिंदे हे भाजपचेच मुख्यमंत्री आहेत, त्यांना भाजपच्या पालख्या वाहाव्या लागणारच, त्यांना भाजपच्या चपला उचलाव्या लागत आहेत, असेही शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

26 नोव्हेंबरला महाविकास आघाडी सरकार स्थापन होणार आहे. त्यामुळे कोणी काय बोलतं याला काही अर्थ नाही. आमच्या काही जागांवर महाविकास आघाडीत काही वाद असतील तर ते दोन दिवसात दूर करुन एकास एक लढत होईल असे पाहीले जाईल असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत पुढे म्हणाले की कोणीही आपल्या जिंकूण आलेल्या जागा सोडायला तयार नसते. त्यामुळे काही वाद किंवा गैरसमजातून अर्ज आले आहेत. त्यांना समजावून अडचणी दूर होतील असेही त्यांनी सांगितले.येथे जनता असुरक्षित असताना आपले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक आपली सुरक्षा वाढवून घेतली आहे.त्यांच्या नागपूरच्या घराबाहेर फोर्सवनचे कमांडो उभे राहीले आहेत. त्यांना नेमकी कोणापासून हल्ल्याची भीती आहे इस्रायल की युक्रेन हे आम्हाला कळायला हवे. ते आमचे मित्र आहेत. कुटुंबवत्सल आहेत. त्यांची आम्हाला काळजी असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या उमेदवारापासून प्रचाराची सुरुवात केली आहे. त्यावर ते भाजपाचे मुख्यमंत्री आहेत त्यांना त्यांच्या चपला उचलाव्या लागणारच अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

 

Published on: Nov 03, 2024 02:28 PM
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम