या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान
संजय राऊत यांनी वैजापूरातील मेळाव्यात जोरदार भाषण केले आहे. ते पुढे म्हणाले की मराठवाड्यात शेतकऱ्यांनी पुराचा फटका बसला आहे. सरकारचे कृषिमंत्री पायाला चिखल लागेल म्हणून गाडीतून खाली उतरायला तयार नव्हते अशी टीका संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत यांनी वैजापूर येथे जोरदार भाषण केले आहे. ते यावेळी म्हणाले की 1500 रुपये देऊन लाडक्या बहीणींना विकत घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतू या महाराष्ट्रामध्ये एकमेव लाडका भाऊ किंवा लाडका मुलगा कोणी असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत. कारण कोरोना काळात मोदींचा मतदार संघ वाराणसी आणि उत्तर प्रदेशात कोरोनात प्रेतांना नदीच्या पाण्यात टाकली जात असताना आपला कुटुंब प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे काळजी घेत होते. आणि उद्धव ठाकरे हे आजारी पडले तेव्हा या 40 गद्धारांनी उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले. आपल्याला या 40 गद्दारांचा सूड घ्यायचा आहे असे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.
Published on: Sep 15, 2024 06:06 PM