‘संजय राऊत खरं सांगा, तुम्ही कुणाचे…’, शिंदे गटाच्या आमदारांची सडकून टीका
काँग्रेसने याआधी मुसलमान यांच्यावर अन्याय केले. शाहा बानू यांना कधीच मदत मिळवून दिली नाही. फक्त मत लाटण्यासाठी काँग्रेसने आपली भूमिका ठेवलेली आहे अशी टीका शिंदे गटाच्या आमदारांनी केली.
मुंबई | 22 ऑक्टोंबर 2023 : काँग्रेस आघाडी सरकार असताना जी कंत्राटी भरती आली होती ती आम्ही रद्द केली. पण, आता नवीन भरती कायम स्वरूपी नोकरीसाठी सरकार करणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर जरांगे यांनी विश्वास दाखवला आहे. कायद्यात आणि कोर्टात टिकलं पाहिजे असे आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे आणि हेच सरकार आरक्षण देईल, असे शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे म्हणाल्या आहेत. संजय राऊत हे डूब्लीकेट आहेत. संजय राऊत यांनी आधी सांगावं ते खरे उद्धव ठाकरे यांचे आहेत की शरद पवार यांचे आहेत. महाविकास आघाडीमध्ये सारखे येणे जाने सुरु आहे. त्यामुळे समाजवादी आणि एमआयएम देखील त्यांच्यासोबत येतील. तसेच, प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर कोणाचेही पटलेलं नाही अशी टीकाही त्यांनी केली.
Published on: Oct 22, 2023 11:42 PM