कुणी काकाचा पक्ष चोरतोय, कुणी बापाचा पक्ष चोरतोय, संजय राऊत कडाडले

| Updated on: Jan 14, 2024 | 1:12 PM

विधानसभाअध्यक्षांनी शिवसेना अपात्र आमदारांच्याबाबत दिलेल्या निकालानंतर देशभरात संतापाचे वातावरण आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निकालाबाबत उद्धव ठाकरे लवकरच चिरफाड करणार आहेत. याबाबत उद्धव ठाकरे जनतेच्या न्यायालयात 16 जानेवारीला वरळी डोम थिएटर येथे महा पत्रकार परिषद घेणार आहेत. दक्षिण मुंबई लोकसभा जागा शिवसेनेची आहे. तेथील उमेदवार उद्धव ठाकरे लवकर जाहीर करतील असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मुंबई | 14 जानेवारी 2024 : जो निकाल शिवसेने संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेला आहे. त्याबाबत संपूर्ण देशात चिड निर्माण झाली आहे. परंतू विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे पुतळे जाळले जात आहेत. त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली जात असून ही लोकशाहीची अंत्ययात्रा असल्याचे म्हटले जात आहे. विधानसभाध्यक्ष पद लोकशाहीचे घटनात्मक पद आहे. तरीही महाराष्ट्रात अशी अंत्ययात्रा का निघत आहे. या सर्वांची माहिती देणारी देशातील पहिलीच महा पत्रकार परिषद येत्या 16 जानेवारीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वरळी डोम थिएटर येथे जनतेच्या न्यायालयात घेणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. या महा पत्रकार परिषद घटनेचे तज्ज्ञ आणि इतर मंडळी हजर असतील असेही संजय राऊत यांनी केली. एकनाथ शिंदे यांनी आधी स्वत:चा पक्ष स्थापन करावा आणि उमेदवार निवडून आणावे. दुसऱ्याचा बापाचा पक्ष चोरुन डिंगी मारुन नये. कोणी काकाचा पक्ष चोरतोय तर कोणी बापाचा पक्ष चोरतोय अशी टीका त्यांनी केली आहे. कोणतेही मंदिर पूर्ण झाल्याशिवाय त्याचे उद्घाटन होऊ नये अशी भूमिका शंकराचार्यांनी घेतली आहे. त्याच चुक काय आहे? शंकराचार्य हे हिंदू धर्माचे प्रमुख आहेत. तज्ज्ञ आहेत. नारायण राणे यांनी त्यांचा अपमान केला आहे. त्यामुळे 22 तारखेच्या आता भाजपाने हिंदू धर्मियांची माफी मागावी अशीही मागणी राऊत यांनी केली आहे.

Published on: Jan 14, 2024 01:09 PM
55 वर्षांचं नातं तुटलं, मिलिंद देवरा यांचं एक ट्विट आणि राजकीय वर्तुळात गोंधळ
सध्या आमची भूमिका तटस्थ, वाट पाहू नाही तर गेम करू, बच्चू कडू यांची थेट धमकी