पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत

| Updated on: May 16, 2024 | 11:51 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी नाशिकच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली होती. त्यालाच आज संजय राऊत यांनी खरमरीत उत्तर दिलं आहे.

सध्या महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकांवरून राजकीय वातावरण खूपच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपली आहे. संजय राऊत यांनी देखील विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतलाय. हेलिकॉप्टरमधून पैशांच्या पेट्या उतरवायच्या, पोलिसांच्या कारमधून पैसे वाटायचे, लाखो मतं विकत घेण्याच्या योजना करायच्या. रेटून खोट बोलायचं हाच त्यांचा जाहीरनामा. याच्या पलीकडे त्यांना जाहीरनामा निर्माण करण्याची गरज नाही. अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

Published on: May 16, 2024 11:51 AM
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले…
नागरिकांची उकाड्यापासून सुटका, ‘या’ तारखेला मान्सून केरळमध्ये दाखल होणार