“गुलाबराव पाटील यांना मंत्रिपद संजय राऊत यांच्यामुळेच मिळालं”, ठाकरे गटाचा गौप्यस्फोट!

| Updated on: Jun 26, 2023 | 1:52 PM

शिरसोली येथे जिल्हा परिषद गट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना गौप्यस्पोट केला.संजय राऊत यांच्यावर टीका करणारे गुलाबराव पाटील यांना मंत्रीपद संजय राऊत यांनीच दिलं होतं असा गौप्यसफोट त्यांनी केला.

जळगाव: शिरसोली येथे जिल्हा परिषद गट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना गौप्यस्पोट केला.संजय राऊत यांच्यावर टीका करणारे गुलाबराव पाटील यांना मंत्रीपद संजय राऊत यांनीच दिलं होतं असा गौप्यसफोट त्यांनी केला. यावेळी संजय सावंत म्हणाले की, “कॅबिनेट मंत्रिपद मिळवण्यासाठी गुलाबराव पाटील संजय राऊत यांच्या दरवाज्यात उभे होते किंवा नाही, हे त्यांनी सांगावं. ज्या संजय राऊत यांच्या शिफारसीमुळे गुलाबराव पाटलांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं, त्याच संजय राऊत यांच्यामुळे पक्षाची वाट लागली असं गुलाबराव पाटलांनी सांगावं. तुम्हाला कॅबिनेट मंत्री केलं हे पाप संजय राऊत यांनी केलं, त्यामुळे पक्षाची वाट लागली. गुलाबराव पाटील यांच्यासारख्या नालायक माणसाला साहेबांनी वेळीच ओळखलं पाहिजे होतं. गुलाबराव पाटील यांनी माझ्यासोबत वणीच्या सप्तशृंगी देवीच्या मंदिरात यावं, देवीच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं की मी संजय राऊत यांच्यामुळे मंत्री झालेलो नाही.”

 

 

Published on: Jun 26, 2023 01:52 PM
विद्यापीठ कुलगुरू यांच्यावर भाजप आमदार संतापला; केबिनमध्येच ठिय्या आंदोलन
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा पत्ता नाही तोच कोठे लागले भावी पालकमंत्रीचे बॅनर