आनंद दिघेंना मारलं गेलं हे अख्खा ठाणे जिल्हा जाणतो, कोणी केला आरोप ?

| Updated on: Sep 28, 2024 | 2:29 PM

आनंद दिघे यांच्या जीवनावरील चित्रपट धर्मवीर - 2 बरोबर निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झाला आहे. प्रथमच एका राजकीय पक्षाने अशा प्रकारे प्रचारासाठी चित्रपट काढला असल्याने महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या दिशेने जाणार आहे याची प्रचिती या प्रकाराने समोर आली आहे.

धर्मवीर – 2 या चित्रपटातील एका सीनवरुन वाद निर्माण झाला आहे. या सीनमध्ये ठाण्याच्या हॉस्पीटलमधून आनंद दिघे यांची डेडबॉडी खांद्यावर घेऊन एकनाथ शिंदे यांचे पात्र धावताना दाखविले आहे. हा सीन खरंच घडला होता यावरुन वाद निर्माण झाला आहे. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी आनंद दिघे यांना मारलं गेलं हे अख्ख्या ठाणे जिल्ह्याला माहिती आहे. चांगला ठणठणीत असलेला माणूस लगेच हार्टअटॅकने कसा काय मरु शकतो. या संदर्भातील गोष्टी हळूहळू बाहेर येतील. संजय राऊत हे त्यावेळी सामनात कारकूनगिरी करीत होते, त्यांना काय माहिती आहे. त्यावेळी ते प्रवक्ते काय व्यासपीठावर देखील नसयाचे त्यांना जिथे तिथे आपणच होतो हे सांगायची सवय आहे. एकतरी आंदोलनातला त्यांच्या फोटो दाखवा.हा शिवसेना फोडण्यासाठी मात्र ते होते असा टोलाही संजय शिरसाठ यांनी यावेळी लगावला.

Published on: Sep 28, 2024 02:29 PM
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक : सर्व उमेदवार विजयी, काय म्हणाले संजय राऊत
ही सुरुवात आहे, गुलाल उधळलाय..येत्या विधानसभेला, मोठ्या विजयानंतर काय म्हणाले आदित्य?