sanjay Shirsat on Khaire | चंद्रकांत खैरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, आमदार संजय शिरसाटांचा घणाघात
sanjay Shirsat on Khaire | चंद्रकांत खैरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, अशी घणाघाती टीका आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे.
sanjay Shirsat on Khaire | शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंच्या (Chandrakant Khaire) डोक्यावर परिणाम झाला आहे, असा घणाघात आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी घातला. खैरे वाटेल ते बोलत आहेत. वडगाव कोल्हाटीसह इतर ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये (Gram Panchayat Election) आमच्या गटाने विजय मिळवल्याने ते आरोप करत सूटल्याची टीका त्यांनी यावेळी केली. वडगाव कोल्हाटी बजाजनगर ग्रामपंचायत निवडणुकीत संजय शिरसाट यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला. मात्र शिरसाट यांनी कमावलेली रसद निवडणुकीत वापरली. मूळ शिवसेनेचे आमदार पळवले, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला होता. त्याला उत्तर देताना आमदार संजय शिरसाट यांनी टीका केलीय. निवडणुकीत ज्याचा विजय होतो, तो नम्रपणे स्वीकारणे आवश्यक आहे. जे उमेदवार ग्रामपंचायतमध्ये निवडून आले त्यांचं सुरुवातीपासूनचं नेतृत्व आपणच करत असल्याचे त्यांनी सांगितले.