“भविष्यात निश्चित अजितदादा मुख्यमंत्री झाले पाहिजेत, पण…”, शिंदे गटाच्या आमदाराचं मोठं विधान
अजित पवार उपमुख्यमंत्रीपद झाल्यापासून मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चांनीही जोर धरला आहे. अजित पवार आज ना उद्या मुख्यमंत्री होतील, असं मोठं वक्तव्य प्रफुल्ल पटेल म्हणाले. यावरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई, 28 जुलै 2023 | अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चांनीही जोर धरला आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य करून एकच खळबळ उडवून दिली आहे. अजित पवार आज ना उद्या मुख्यमंत्री होतील, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. यावरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं, अजित पवार भविष्यात मुख्यमंत्री होतील. भविष्यात निश्चित अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत. पण तोपर्यंत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत. आणि भविष्यात म्हणजे दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकतात.”
Published on: Jul 28, 2023 08:56 AM