अंबादास दानवे यांची डॉक्टरेट पदवी बोगस? पाहा काय म्हणाले संजय शिरसाट…
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत "विकासकामांच्या बाबतीत सरकार आमचा मुकाबला करू शकत नाही म्हणून सरकार आमच्यावर धाडी मारतंय," अशी टीका केली होती. यावर शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी पलटवार केला आहे.
औरंगाबाद : शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर टीका केली आहे. अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत “विकासकामांच्या बाबतीत सरकार आमचा मुकाबला करू शकत नाही म्हणून सरकार आमच्यावर धाडी मारतंय,” अशी टीका केली. यावर संजय शिरसाट यांनी पलटवार केला आहे. “अंबादास दानवे आणि त्यांचा नेता दोघं खोटं बोलतात. ते डॉक्टर अंबादास दानवे होते ना? त्यांची डॉक्टरेटची पदवीच बोगस मिळवली ती आता परत केली, अंबादास दानवे यांनी डॉक्टर असं लिहून दाखवावं. खरंतर अंबादास दानवेंवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे.खोटं बोल पण रेटून बोल ही तुमची वृत्ती आता लोकांसमोर येणार,” असं शिरसाट म्हणाले.
Published on: Jun 25, 2023 12:22 PM