“ठाकरे गटाने बाळासाहेबांना लॉकरमध्ये ठेवलं, आम्ही त्यांना लॉकरबाहेर काढून मंदीर बनवतोय”
शिंदेगटाचे नेते संजय शिरसाठ यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवेंवर टीका केलीय. पाहा व्हीडिओ...
शिंदेगटाचे नेते संजय शिरसाठ यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवेंवर टीका केलीय. “बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आम्ही आहोत. पण ठाकरेगटाने बाळासाहेबांना लॉकरमध्ये बंद केलं होतं. आम्ही त्यांना लॉकरमधून बाहेर काढलं. आता त्यांचं मंदिर बनवत आहोत”, असं संजय शिरसाट म्हणालेत. अंबादास दानवेंना राजकारण कळतं का हा प्रश्न आहे. माझं थोबाड फोडण्याचं स्टेटमेंट कळलं नसेल म्हणून ते बोलत असावेत, मला त्यावर बोलणं योग्य वाटत आहे, असं शिरसाट म्हणालेत.
Published on: Jan 24, 2023 01:05 PM