औरंगाबादचं नाव बलण्याचं श्रेय केवळ ‘या’ दोनच लोकांचं; संजय शिरसाठ यांचा मोठा दावा
शिवसेनेचे नेते, आमदार संजय शिरसाठ यांनी औरंगाबादच्या नामांतर भाष्य केलंय. तसंच इम्तियाज जलील यांनाही शिरसाट यांनी सल्ला दिलाय. ते काय म्हणालेत? पाहा...
मुंबई : शिवसेनेचे नेते, आमदार संजय शिरसाठ यांनी औरंगाबादच्या नामांतर भाष्य केलंय. औरंगाबादचं आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांची नावं बदलली गेली. याचं श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आहे, असं संजय शिरसाट म्हणालेत. इम्तियाज जलील यांना मोगलाईचं, औरंगाबादचं बीज तिथं पेरायचंय. एवढंच वाटत असेल तर जलीलजी, तुम्ही तुमच्या मुलांची नावं औरंगजेब ठेवा, असंही शिरसाट म्हणालेत. विरोधीपक्षाने जरा अभ्यास करावा. दोन्ही जिल्ह्यांची नावं कशी बदलली गेली त्याचा अंबादास दानवे यांनी अभ्यास करावा, असंही शिरसाट म्हणालेत.
Published on: Feb 25, 2023 12:40 PM