इम्तियाज जलील निजामाची औलाद, हैदराबादचं पार्सल आम्ही सहन करणार नाही; शिवसेनेच्या नेत्याची जहरी टीका

| Updated on: Mar 05, 2023 | 1:15 PM

Sanjay Shirsat on Imtiaz jaleel : इम्तियाज जलील , तुला छत्रपती संभाजी नगर म्हणावंच लागेल; असं म्हणत शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर निशाणा साधलाय. पाहा...

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली आहे. “इम्तियाज जलील ही निजामाची औलाद आहे. असदुद्दीनओवैसी आणि इम्तियाज जलील हे हैदराबादचं पार्सल आहे. म्हणून ते औरंजेबाचा फोटो दाखवतात. पण आम्ही हे सहन करणार नाही. आम्ही इम्तियाज जलील जाणीव करून देऊ की तुला आता संभाजी नगर म्हणावं लागेल”, असं शिरसाट म्हणालेत. औरंगाबादच्या नामांतराला एमआयएमचा विरोध आहे. त्यावरून शिवसेनेने टीका केली आहे.

Published on: Mar 05, 2023 01:11 PM
कसबा तो झाकी है, Uddhav Thackeray को डूबाना बाकी है; संजय शिरसाठ यांची राऊतांवर टीका
खेडच्या सभेसाठी उद्धव ठाकरे धृतराष्ट्राच्या भूमिकेत; शिवसेनेच्या नेत्याचं टीकास्त्र