महाविकास आघाडीच्या कालच्या सभेकडे लोकांनी पाठ फिरवली; संजय शिरसाट यांचं टीकास्त्र

| Updated on: Apr 03, 2023 | 3:18 PM

Sanjay Shirsat : वज्रमूठ प्रयोग फसला आहे. तुम्ही भाषण पाहिलं तर आघाडी ही मजबूत होण्यासाठी नव्हती. ते प्रत्येकाने आपापल्या नेत्या संदर्भात मांडलेली मत होती, असं म्हणत संजय शिरसाट यांनी टीका केली आहे.

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचे नेते संजय शिरसाठ यांनी महाविकास आघाडीच्या कालच्या वज्रमूठ सभेवर टीका केली आहे. “वज्रमुठ वगैरे काही नाही महाविकास आघाडीचा हा आणखी एक प्रयोग होता. आपण महाविकास आघाडी केल्यानंतर घेतलेली पहिली सभा कशी होईल? या सभेसाठी सगळ्यांनी प्रयत्न केले. काँग्रेस, राष्ट्रवादीने प्रयत्न केले. उद्धव ठाकरे गटाने प्रयत्न केले. पण तरिही म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही”, असं म्हणत शिरसाट यांनी टीका केली आहे. यापूर्वी झालेल्या सभा सांस्कृतिक मंडळावरील उद्धव ठाकरेंच्या सभेला ग्राउंड पॅक असायचं. तीन पक्ष मिळून गर्दी व्हायल पाहिजे होती. मात्र तसं काही दिसलं नाही. खुर्ची रिकाम्या होत्या, असंही शिरसाट म्हणाले.

हे भोंदू बाबा आहेत, भोंदू बाबा; अजित पवार वैतागले
द्वेषाने पछाडलेल्या लोकांची सभा; शंभूराज देसाईंचा ठाकरेंवर निशाना