मनसे-भाजप युतीवर शिवसेनेचा आमदार म्हणतो, “कधी कोण युती करेल…”
मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांचं टोलनाका तोडफोड प्रकरण चांगलचं चर्चेत आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर भाष्य करताना भाजपवर टीका केली आहे. यावर शिवसेना आमदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई, 26 जुलै 2023 | मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांचं टोलनाका तोडफोड प्रकरण चांगलचं चर्चेत आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर भाष्य करताना भाजपवर टीका केली आहे. महाराष्ट्रात रस्ते बनवण्यात नितीन गडकरी अपयशी झालेत. बांद्रा वरळी सी लिंक 10 वर्ष जातात आणि रामायणात सेतू पूल बांधण्यात आला पण रस्ते होईना, अशी टिप्पणी राज ठाकरे यांनी केली आहे. तसेच मी भाजप नेत्याशी बोलतो म्हणजे युती होत नाही, मी भाजपशी युती करणार नाही असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांच्या या विधानानंतर शिवसेना आमदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाट यांनी अमित ठाकरे यांची टोल नाक्यावर का अडवली यांचं कारणही सांगितलं आहे, यासाठी पाहा हा व्हिडीओ…
Published on: Jul 26, 2023 02:51 PM