“अजित पवारांनी समज दिल्याने संजय राऊत…”, शिवसेनेच्या नेत्याची टीका

| Updated on: Jun 05, 2023 | 3:05 PM

संजय राऊत यांनी ‘धरणामध्ये लघुशंका करण्यापेक्षा थुंकणे चांगले’, असे प्रत्युत्तर राऊत यांनी पवार यांना दिले. परंतु दुसऱ्या दिवशी संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्याचा खेद व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया दिली. यावरून आता शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : संजय राऊत यांनी ‘धरणामध्ये लघुशंका करण्यापेक्षा थुंकणे चांगले’, असे प्रत्युत्तर राऊत यांनी पवार यांना दिले. परंतु दुसऱ्या दिवशी संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्याचा खेद व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया दिली. यावरून आता शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हल्ली सामना पेपरमध्ये शिवसेना प्रमुखचा फोटो न दिसता राहुल गांधी दिसतात.नेत्यांनी तुम्हाला दाखवून दिले की, आपण एका लायनीत बसायला हवे, उद्धव ठाकरे यांच्या साठी असलेली विशेष खुर्ची काढायला लावली. सिल्व्हर ओक वर जाऊन कॉम्प्रोमाईज करावं लागतं. अजित पवार यांनी खुट्टा ठोकला त्यामुळे तुमच्यात बदल झाला, आता तुमची जळलेली आहे”, असं संजय शिरसाट म्हणाले.

 

Published on: Jun 05, 2023 03:00 PM
कांद्यानं सहनशिलताच संपवली? शेतकरी थेट रस्त्यावरच उतरले; केली ‘ही’ मागणी
‘सुपारी घेऊन मी काम करत नाही’, ‘त्या’ व्हायरल पोस्टनंतर भाजप खासदार काय म्हणाले?