संजय राऊत गांडूळ आहेत! ते…; शिवसेनेच्या नेत्याचा थेट हल्लाबोल

| Updated on: Mar 27, 2023 | 7:54 AM

आमच्या संपर्कात किती नेते, आमदार आहेत काही दिवसात स्पष्ट होईल. लोकांच्या मनात आहे ते घडेल. पुन्हा म्हणू नका गेले ते गद्दार आणि राष्ट्रवादीतून आले होते, असं म्हणत शिवसेना नेत्यानं टीका केलीय.

छत्रपती संभाजीनगर : संजय राऊत हे गांडूळ आहेत. ते शरद पवार यांच्याबद्दलही काहीही बोलू शकतात, असं म्हणत शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरे यांनी देशाचं पंतप्रधान व्हावं, त्यांना कुणी थांबवलंय? एवढे आमदार खासदार जाऊनही तुम्हाला वाटतं असेल की आता तुमचं सरकार येईल तर आमच्या शुभेच्छा आहेत, असं शिरसाट म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांची मजबुरी झाली आहे की, महाविकास आघाडीच्या लोकांचे शर्ट पकडून चालत आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडून काहीतरी चूक झाली असेल म्हणूनच बाळासाहेबांचे खंदे समर्थक सोडून गेले.याचा विचार उद्धव ठाकरे यांनी केला पाहिजे. पश्चाताप व्यक्त केला पाहिजे, असंही शिरसाट म्हणावलेत.

Published on: Mar 27, 2023 07:50 AM
आत्मपरीक्षण करा तुम्ही किती भट्टाचार केला; ठाकरे यांनी केल्या भाषणावर बावनकुळेंचं उत्तर
उद्धवसाहेब, ‘त्या’ कॉन्ट्रॅक्टर्सची अन् माझी नार्को टेस्ट करा, कळेल तुम्हाला खोके आले की मला!; ठाकरेंना ओपन चॅलेंज