उद्धव ठाकरे यांच्या मोर्चामागचं नेमकं कारण काय? संजय शिरसाट स्पष्टच म्हणाले…

| Updated on: Jun 27, 2023 | 12:01 PM

ठाकरे गटाने मुंबई महापालिकेवर येत्या १ जुलैला महामोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चाचे नेतृत्व ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली होती. "महापालिकेच्या पैशांची उधळपट्टी रोखण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई : ठाकरे गटाने मुंबई महापालिकेवर येत्या १ जुलैला महामोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चाचे नेतृत्व ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली होती. “महापालिकेच्या पैशांची उधळपट्टी रोखण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.यासाठी दादर येथील शिवसेना भवनमध्ये उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची बैठक घेतली होती. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही बैठक संघटनेसाठी नाही, तर आदित्य ठाकरे यांना पुन्हा लाँच करण्यासाठी घेतली होती. मुंबई महानगरपालिकेचा नेता कोण तर आदित्य ठाकरे, असं दाखवण्यासाठी ही बैठक झाली. यासाठी शाखाप्रमुख, नगरसेवक, विभाग प्रमुख व इतर सर्वांना वेठीस धरून हा मोर्चा काढावा लागतोय आणि त्यांच्या मोर्चाला लोकांचा प्रतिसाद मिळणार नाही यासाठी बैठक आयोजित केली आहे.

Published on: Jun 27, 2023 12:01 PM
“बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावरच राजकारण बंद करा”, शीतल म्हात्रे यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल
“अनिल परब सरकारचे जावई आहेत का?”, पालिका अधिकाऱ्यावर मारहाण प्रकरणी संदीप देशपांडे यांची टीका