“काकांच्या खंजीराला आता उद्धव ठाकरे यांची पाठ खुणावतेय”, गद्दारीवरून संजय शिरसाट यांची बोचरी पोस्ट
काल ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गद्दार दिन साजरा करण्यात आला. याला शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युतर देत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. संजय शिरसाट यांनी शरद पवार यांचं नाव न घेता गद्दार म्हणत एक पोस्ट केली आहे. संजय शिरसाट यांच्या पोस्टमध्ये 1978 आणि 1999 च्य राजकीय घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे.
मुंबई : काल ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गद्दार दिन साजरा करण्यात आला. याला शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युतर देत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. संजय शिरसाट यांनी शरद पवार यांचं नाव न घेता गद्दार म्हणत एक पोस्ट केली आहे. संजय शिरसाट यांच्या पोस्टमध्ये 1978 आणि 1999 च्य राजकीय घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. संजय शिरसाट यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “1978च्या जुलै महिन्यात राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु असताना मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यावर वीज कोसळली. 40 आमदारांना सोबत घेऊन `काका` सरकारमधून बाहेर पडले.वसंतदादांच्या पाठीत खूपसलेला तो खंजीर….”, संजय शिरसाट यांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलं आहे, यासाठी पाहा हा व्हिडीओ…
Published on: Jun 21, 2023 01:47 PM