“गौतमी पाटील फेमस, लोकांची करमणूक करते, संजय राऊत तर…”, संजय शिरसाट यांचा निशाणा
भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली. "मविआचा गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत",असं नितेश राणे बोलले. त्यांच्या या टीकेवर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली. “मविआचा गौतमी पाटील म्हणजे संजय राऊत”,असं नितेश राणे बोलले. त्यांच्या या टीकेवर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “गजानन कीर्तिकर हे शिस्तीचे पक्के नेते आहेत. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करणे समजू शकतो. त्यांनी आजही कुठला निर्णय घेतला तरी ते ठाम असतात.नितेश राणे यांनी गौतमी पाटील आणि संजय राऊत यांची तुलना करू नये. गौतमी पाटील फेमस आहे. ती लोकांची करमणूक करते.हा माणूस सकाळी उठून लोकांचं डोकं खराब करतो.गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात लाठी चार्ज होतो ही लोकप्रियता.यांचा भुंगा सुरू झाला की लोक चिडायला लागतात ही यांची लोकप्रियता. संजय राऊत गौतमी पाटीलपेक्षा छोटा माणूस आहे”, संजय शिरसाट म्हणाले.
Published on: May 27, 2023 02:39 PM