“जयंत पाटील भाजपच्या वाटेवर…,” शिवसेनेच्या आमदाराचा खळबळजनक दावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. अशातच शिवसेनेचं आमदार संजय शिरसाट यांनी जयंत पाटील भाजपच्या वाटेवर आहेत, असा दावा केला आहे. संजय शिरसाट यांनी केलेल्या दाव्यानंतर राजकारणात आता चर्चांना उधाण आलं आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. अशातच शिवसेनेचं आमदार संजय शिरसाट यांनी जयंत पाटील भाजपच्या वाटेवर आहेत, असा दावा केला आहे. संजय शिरसाट यांनी केलेल्या दाव्यानंतर राजकारणात आता चर्चांना उधाण आलं आहे. “जयंत पाटील वाटतं का राष्ट्रवादीत राहणार. शरद पवार यांनी राजीनामा दिला होता, तेव्हा फक्त जयंत पाटील रडत होते, हे तुम्हाला माहित आहे? जयंत पाटलांना पुढे काय घडणार हे माहिती आहे. त्यामुळे शरद पवारांनी राजीनामा दिला, तर मी मेलोच याची भीतीने ते रडत होते. त्यांच्या रडण्याचा पवारांच्या राजीनाम्याशी कोणताही संबंध नव्हता. काही दिवस वाट पाहा. तुम्हाला त्यांचे मार्गक्रमण कुठे होईल, हे दिसेल,” असं शिरसाट म्हणाले.
Published on: Jun 21, 2023 07:10 AM