“अजितदादांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नका”, शिंदे गटाच्या नेत्याने ठणकावलं…

| Updated on: Jul 16, 2023 | 1:28 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखातं मिळाल्यानंतर विरोधक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर टीका करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

औरंगाबाद, 16 जुलै 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखातं मिळाल्यानंतर विरोधक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर टीका करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच संजय शिरसाट यांनी काँग्रेसचा एक गट फुटणार असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे फोन घेत नव्हते. भेटत नव्हते. आम्ही अजितदादांकडे जायचो तर ते म्हणायचे उद्धव साहेबांना सांगा. रिमार्क्स आणा. मी तुम्हाला निधी देतो. पण उद्धव ठाकरे रिमार्क देतच नव्हते. गेल्या अडीच वर्षाच्या काळात उद्धव ठाकरे यांची माझ्या एकाही पत्रावर एक जरी सही दाखवली तरी मी आमदारकी सोडेल. तिजोरीच्या चाव्या कुणाकडे असल्या तरी सर्वांचा एकमुखी निर्णय होतो, त्याला महत्त्व आहे. खातं घेण्यापूर्वीच अजितदादांना टार्गेट का करत आहात? तुम्ही अजितदादांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नका. तेव्हा आम्ही अजितदादांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं याचं कारण आमचा मुख्यमंत्री बरोबर नव्हता. अजितदादा अधिकाराचा वापर करायचे. त्यांनी अधिकाराचा वापर केला ते गैर नाहीये. त्यांनी त्यांचा पक्ष वाढवला. आम्हाला झोप लागली होती. आम्हाला कुंभकर्णाची झोप लागली होती.”

Published on: Jul 16, 2023 01:28 PM
विदर्भाचे नंदनवन असणाऱ्या चिखलदऱ्यात वीकेंडला पर्यटकांची पावले
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अन् अजित पवार, खरा मुख्यमंत्री कोण? सुनील राऊत म्हणतात, “जनता कन्फ्युज”