“हल्ल्यानंतर एकनाथ शिंदेंचा फोन आला, आणि म्हणाले…”, बांगर यांनी सांगितला मुख्यमंत्र्यांच्या फोनचा किस्सा
शिंदेगटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर काल अमरावतीत हल्ला झाला. त्याविषयी त्यांच्याशी बातचित केली असता त्यांनी विविध मुद्दे मांडले.
मुंबई : शिंदेगटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्यावर काल अमरावतीत हल्ला झाला. त्याविषयी त्यांच्याशी बातचित केली असता त्यांनी विविध मुद्दे मांडले. यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांचा फोन आल्याचं सांगितलं. हल्ल्यानंतर शिंदेंनी मला फोन केला होता. त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती घेतली. कारवाईचंही आश्वासन त्यांनी दिलं आहे, असं बांगर म्हणालेत.
Published on: Sep 26, 2022 11:47 AM