Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? पाहा इनसाईड स्टोरी

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरण; काय आहे सुनावणीचे अपडेट्स? पाहा इनसाईड स्टोरी

| Updated on: Mar 26, 2025 | 1:46 PM

Santosh Deshmukh Case Hearing : nसंतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी आहे. सध्या बीड न्यायालयात ही सुनावणी सुरू आहे. सरकारी वकील उज्वल निकम यांनी आपला युक्तीवाद पूर्ण केला असून सध्या आरोपींच्या वकिलांचा युक्तीवाद सुरू आहे.

बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची दुसरी सुनावणी आज बीड न्यायालयात सुरू झाली आहे. यावेळी संतोष देशमुख यांचे सरकारी वकील उज्वल निकम यांनी युक्तिवाद करताना गँग लीडर सुदर्शन घुले याला कराडने गाईड केलं असल्याचं म्हंटलं आहे. कराड याने त्याला गाईड केलं असल्याचं सीडीआरमधून समोर आल्याचं निकम म्हणाले.

पुढे आपल्या युक्तिवादात उज्वल निकम म्हणाले की, फरार आरोपी कृष्णा आंधळे याने वाल्मिक कराड आणि विष्णु चाटे याला फोन केला होता. यावेळी आरोपींच्या वकिलांनी मागितलेली कागदपत्र आणि साहित्य पुरवण्यात आले. यावेळी आरोपींचे जबाब देखील आरोपींना दिले जातील. यावेळी सरकारी टन वकील उज्वल निकम यांनी संपूर्ण घटनाक्रम न्यायालयात मांडला. आता आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद सध्या न्यायालयीन सुनावणीमध्ये सुरू आहे.

Published on: Mar 26, 2025 01:46 PM
Bachchu Kadu : शरद पवारच आता अजित पवार यांच्यासोबत जातील… बच्चू कडू यांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
‘तुम्ही मुसलमांनाना का डॉमिनेट करता?, ‘शिरसाट अन् आव्हाडांमध्ये खडाजंगी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर काय घडलं?