माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, मोर्च्यापूर्वी संतोष देशमुख यांच्या कन्येने केली मागणी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर शनिवारी बीड जिल्ह्यातील कलेक्टर कार्यालयावर सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. आता या संदर्भात बुलढाणा येथील सिंदखेड राजा या ठिकाणी सकल मराठा समाजाने सोमवारी संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी मोर्चाचे आयोजन केले आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला जवळपास महिना होत आला तरी अजूनही आरोपी फरार आहेत. या संदर्भात शनिवारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात अनेक पक्षांचा सहभाग होता. बुलढाणा येथील सिंदखेड राजा येथे सोमवारी सकल मराठा समाजाने मोर्चा काढण्याची तयारी केली आहे. या मोर्चापूर्वी दिवंगत संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हीने माझ्या वडीलांना न्याय मिळायला हवा. या पूर्वी मराठा समाजाच्या मोर्च्यांना लाखोंचा समुदाय जमा झाला होता. आताही त्याच संख्ये लोकांना जमून माझ्या कुटुंबियांना आधार द्यावा अशी मागणी वैभवी देशमुख यांनी केली आहे. देवा भाऊंनी लाडक्या बहिणींना न्याय द्यावा आणि आरोपींवर कारवाई केली जावी अशी मागणी संतोष देशमुख यांच्या पत्नीने केली आहे.
Published on: Dec 30, 2024 01:58 PM