बिहारच्या राजकारणात भूकंप; अल्पसंख्याक कल्याण मंत्री संतोष सुमन यांचा राजीनामा

| Updated on: Jun 13, 2023 | 2:59 PM

गेल्या काही दिवसापासून ते नितीश कुमार यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात होते. तर आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी राजीनामा दिल्याने ते भाजपशी हात मिळवणी करू शकतात, अशी चर्चा सुरू आहे. तर याच्याआधीत त्यांनी आपल्याला महाआघाडीत सन्मान मिळाला नाही तर ते बाहेर पडतील.

मुंबई : बिहारमधील महाआघाडी सरकारला मोठा झटका बसला आहे. अल्पसंख्याक कल्याण मंत्री संतोष सुमन यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. ते हिंदुस्थान अवाम मोर्चाचे (एचएएम) नेते जीतन राम मांझी यांचे सुपूत्र आहेत. तर गेल्या काही दिवसापासून ते नितीश कुमार यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात होते. तर आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी राजीनामा दिल्याने ते भाजपशी हात मिळवणी करू शकतात, अशी चर्चा सुरू आहे. तर याच्याआधीत त्यांनी आपल्याला महाआघाडीत सन्मान मिळाला नाही तर ते बाहेर पडतील. इतकेच काय तर बिहारमधील लोकसभेच्या सर्व 40 जागा लढवतील. राजीनामा देताना संतोष सुमन म्हणाले की, त्यांच्या पक्षावर जेडीयूकडून विलीनीकरण करण्यासाठी दबाव आणला जात होता.

Published on: Jun 13, 2023 02:59 PM
मनसे नेते वसंत मोरे भावी खासदार, पुण्यात मनसेकडून जोरदार बॅनरबाजी
बिपरजॉय चक्रीवादळाच्या संकटादरम्यान ‘या’ चार राज्यांत भूकंपाचे मोठे हादरे