“शरद पवार माझ्या वडिलांप्रमाणे, मात्र…”, अजित पवार यांना पाठिंब्याची सही करणाऱ्या आमदाराचा गौप्यस्फोट
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटांची मुंबईत बैठक पार पडली. मात्र या बैठकीला राष्ट्रवादीच्या नाशिकच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे मात्र गैरहजर होत्या. प्रकृतीचे कारण देत सरोज अहिरे यांनी दोन्ही बैठकांना जायचा टाळल्याने समोर आले आहे. यानंतर त्यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटांची मुंबईत बैठक पार पडली. मात्र या बैठकीला राष्ट्रवादीच्या नाशिकच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे मात्र गैरहजर होत्या. प्रकृतीचे कारण देत सरोज अहिरे यांनी दोन्ही बैठकांना जायचा टाळल्याने समोर आले आहे. यानंतर त्यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “दोन्ही गटांमध्ये मी स्वत: भेटून आली आहे. मी अजित पवार आणि शरद पवार दोघांना भेटून आले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या बोलणं झालं. शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी फोनवर बोलणं झालं. माझ्यासाठी शरद पवार आणि अजित पवार हे एकच नाणं आहे. आम्ही पक्ष म्हणून त्यांच्यासोबत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आमचा परिवार आहे. मी आमच्या परिवारासोबत आहे. आज दोन मेळावे वेगळे झाले आहेत. सर्व लोकांशी चर्चा केल्यानंतरच मी माझ्या मतदारसंघाच्यावतीने भूमिका स्पष्ट करेन. शरद पवार यांना मी वडिलांसारखं मानते. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी त्यांना मानत राहीन. माझ्यासाठी ते आदरणीय आहेत. तर अजित दादा हे माझ्या मतदारसंघात मला उभं करण्यासाठी, मला तिकीट देण्यापासून माझ्या मतदारसंघात निधी देण्यापर्यंत अनेक प्रकारची मदत त्यांनी केलेली. त्यामुळे त्यांच्याही उपकाराची जाणीव माझ्या मनात आहे”, असं अहिरे म्हणाल्या. अहिरे यांनी शपथविधी दरम्यान झालेल्या घडामोडींरही भाष्य केलं आहे, यासाठी पाहा हा व्हिडीओ…