बावधन येथील बगाड यात्रेत हजारोच्या संख्येने भाविकांची उपस्थिती

| Updated on: Mar 22, 2022 | 11:46 AM

राज्यातील सुप्रसिद्ध अशी वाई तालुक्यातील बावधन (Bavdhan) येथील बगाड यात्रा 22 मार्च रोजी पार पडणार आहे. या यात्रेचे बगाडाची बांधणी ही अंतिम टप्प्यात आली आहे.

राज्यातील सुप्रसिद्ध अशी वाई तालुक्यातील बावधन (Bavdhan) येथील बगाड यात्रा 22 मार्च रोजी पार पडणार आहे. या यात्रेचे बगाडाची बांधणी ही अंतिम टप्प्यात आली आहे. या बरोबरच बगाड मार्गाची स्वच्छता करण्यात येत असून रस्ता रुंद केला जात आहे. गेली 2 वर्ष कोरोनामुळे (Corona) यात्रा भरवता न आल्याने आणि यंदा निर्बंध संपल्याने मोठ्या उत्साहात बगाड यात्रा साजरी होणार आहे.. या यात्रेचा यंदाचा मान शेलारवाडी येथील बाळासाहेब मांढरे यांना मिळाला आहे. या यात्रेचा बगाड्या होण्यासाठी देवाला प्रतीवर्षी होळी (Holi)पौर्णिमेच्या रात्री भैरवनाथाच्या मंदिरात कौल लावला जातो. होळी पौर्णिमेनिमित्त बागड कोणावर आलाय याचा कौल नाथाच्या कृपेने पंच मंडळी घेत असतात. बगाडाच्या एक दिवस आधी रात्री भैरवनाथ मंदिरासमोर हे बगाड उभे केले जाते यानंतर देवाचा छबिना बगाड्या सह सोनेश्र्वर मंदिराच्या दिशेने वाजतगाजत पाठवला जातो.

Published on: Mar 22, 2022 11:46 AM
कुर्ला परिसरात ED ची छापेमारी, ईडीच्या अधिकाऱ्यांसह CRPF ची टीम दाखल
दहशत माजवणारा Leopard अखेर जेरबंद