भाजपनंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्यानंही ‘मस्ती’ हा शब्द वापरला; शब्द वापरलाच थेट इशाराही दिला

| Updated on: Jun 06, 2023 | 8:25 AM

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु असलेल्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोदून काढणार असा इशारा दिला होता. आता त्याच शशिकांत शिंदे यांनी सरकारला आता थेट इशारा दिला आहे. तसेच शिंदे-फडणवीस सरकारलाच आता एका वर्षात मस्ती आल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

सातारा : काही दिवसांपुर्वी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बूथबांधणी बैठकीत आमदार शशिकांत शिंदे यांनी शासकीय बदल्यासाठी पैसे घेत असल्याचा गौप्य स्फोट केला होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु असलेल्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोदून काढणार असा इशारा दिला होता. आता त्याच शशिकांत शिंदे यांनी सरकारला आता थेट इशारा दिला आहे. तसेच शिंदे-फडणवीस सरकारलाच आता एका वर्षात मस्ती आल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा साडे तीन जिल्ह्यांचा पक्ष आहे म्हटलं होतं. पण हा पक्ष आता सरकारला पाडू शकतो हेच दाखवून द्यायचं असल्याचंही ते म्हणाले.

Published on: Jun 06, 2023 08:25 AM
“आनंद दिघेंना शरद पवारांनीच जेलमध्ये टाकलं होतं का ?”, नरेश म्हस्के यांचा जितेंद्र आव्हाड यांना सवाल
Special Report | जागा एक, दावे अनेक, 12 लोकसभा जागांच्या 12 भानगडी