महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच- जयंत पाटील

| Updated on: Apr 30, 2023 | 9:31 AM

Jayant Patil on Maharashtra CM : आगामी विधानसभा निवडणूक, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद अन् राष्ट्रवादी पक्ष; जयंत पाटील यांची सविस्तर प्रतिक्रिया, पाहा व्हीडिओ...

कराड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मागतच्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या नेत्यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून पोस्टर्स लागलेत. कधी अजित पवार, कधी सुप्रिया सुळे तर कधी जयंत पाटील यांच्या नावाचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून पोस्टर्स लागले. या सगळ्या चर्चांदरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलंय. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार हे आता सगळ्यांनी मान्य केलं आहे. महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी भविष्यात पुढे येईल, असंही जयंत पाटील म्हणालेत. कराडमध्ये बोलताना जयंत पाटील यांनी हे विधान केलंय.

Published on: Apr 30, 2023 09:31 AM
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती पहिला निकाल हाती; पाहा कोण झालं विजयी
जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर, घराचे पत्रे उडाले तर झाडं कोसळ्यानं रस्ते बंद