सातारा-पाठणच्या मोरणा गावात गोळीबार, दोघांचा मृत्यू; 1 गंभीर

| Updated on: Mar 24, 2023 | 11:21 AM

ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे माजी संपर्कप्रमुख मदन कदम यांनी पाटण तालुक्यातील मोरणा खोऱ्यात केलेल्या गोळीबारात दोघे जण ठार झाले

कराड : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामधील मोरणा गावात आज गोळीबार झाल्याने परिसरात खळबळ माजली. पाटण तालुक्यातील मोरणा भागात गोळीबार झाल्याने 2 जण ठार तर 1 गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. मोरणा गावात गोळीबार होताच पोलिसांनी धाव घेत तपास सुरू केला आहे. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.

ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे माजी संपर्कप्रमुख मदन कदम यांनी पाटण तालुक्यातील मोरणा खोऱ्यात केलेल्या गोळीबारात दोघे जण ठार झाले. तर एक जण जखमी झाला असून हा गोळीबार पवनचक्कीच्या जुन्या व्यवहारातून झाल्याची चर्चा आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून मदन कदम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आहेत. तर गोळीबारात ठार झालेला एक जण शंभूराजे देसाई यांचा कार्यकर्ता असल्याचं समजत आहे.

Published on: Mar 20, 2023 08:22 AM
बागेश्वर बाबांवरून नाना पटोलेंचा भाजपवर निशाना; म्हणाले…
SuperFast News | नागपूरमधील प्रवास आता गारेगार होणार; 40 इलेक्ट्रिक बस दाखल