जेव्हा शिवेंद्रराजे ST अधिकाऱ्यावर भडकतात….

| Updated on: Sep 25, 2022 | 9:03 AM

Shivsendraraje Bhosale : आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा एसटी व्यवस्थापकाला कडक शब्दात सुनावलं आहे. पाहा नेमकं काय झालं...

संतोष नलावडे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, सातारा : आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivsendraraje Bhosale) यांनी सातारा एसटी व्यवस्थापकाला (ST Officer) कडक शब्दात सुनावलं आहे. साताऱ्यातील परळी, केळवली, वावदरे आणि ठोसेघर भागातील अतिदुर्गम अशा खेडोपाडी लालपरीची सुविधा कोरोनापूर्व काळात सुरळीत सुरू होती. मात्र लॉकडाऊननंतर ही सेवा पूर्ववत झालेली नाही. त्यामुळे वयोवृद्ध,रुग्ण, शाळेतील विद्यार्थी आणि रोजंदारीवर कामाला जाणारा कामगार वर्ग यांची गैरसोय होत आहे. शिवेंद्रराजे भोसले यांनी खेडोपाड्यातील लोकांची होणारी गैरसोय लक्षात घेता सातारा एसटी महामंडळातील आधिकाऱ्याना खडे बोल सुनावले. एसटीची सुविधा जर पूर्ववत सुरू झाली नाही तर आम्ही काय करायचे ते करू, अशा कडक शब्दात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. संबंधित आधिकाऱ्यानीही यावेळी आम्ही एसटी ची सुविधा ताबडतोब पूर्ववत करू अशी हमी यावेळी दिली आहे.

Published on: Sep 25, 2022 08:58 AM
दसरा मेळाव्याच्या वादानंतर आता शिवसेनेची ‘या’ ठिकाणी कोंडी करणार
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची रणनिती तयार; मंत्र्यांना दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना