इलाका तुम्हारा धमाका हमारा!; शंभुराज देसाईंच्या होमग्राउंडवर जात सुषमा अंधारेंचं थेट आव्हान
शिवसेना ठाकरेगटाच्या नेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेनिमित्त साताऱ्यातील पाटणमध्ये होत्या. यावेळी त्यांनी शंभुराज देसाईंवर तोफ डागली. त्या काय म्हणाल्यात? सुषमा अंधारे यांचं अनकट भाषण...
सातारा : शिवसेना ठाकरेगटाच्या नेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेनिमित्त साताऱ्यातील पाटणमध्ये होत्या. पाटण हा मंत्री शंभुराज देसाई यांचा मतदारसंघ. देसाईंच्या होमग्राउंडमध्ये जात अंधारेंनी थेट आव्हान दिलंय. इलाका तुम्हारा हैं, लेकिन धमाका हमारा होगा!, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. तसंच शंभुराज देसाई यांना पुन्हा गुलाल लागणार नाही, हे वचन घेऊ, असंही अंधारे म्हणाल्या आहेत. आम्ही हिंदुत्वाच्या अस्मितेसाठी गद्दारी केली, म्हणणाऱ्यांनी भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध केला नाही? असा सवालही अंधारेंनी विचारला आहे.
Published on: Feb 13, 2023 07:57 AM