‘जीत’ सत्याची, विजय नव्या पर्वाचा!; निकालाआधीच सत्यजित तांबे यांच्या अभिनंदनाचे पोस्टर
नाशिक पदवीधर निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा होतेय. सत्यजित तांबे यांच्या विजयाचे पोस्टरही पुण्यात लागले आहेत. पाहा ते काय म्हणालेत...
नाशिक पदवीधर निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा होतेय. सत्यजित तांबे यांनी बंडखोरी केल्यानंतर या मतदारसंघाची जोरदार चर्चा झाली.सत्यजित तांबे विरूद्ध शुभांगी पाटील अशी ही लढत होतेय. दोन्ही बाजूने विजयाचा दावा केला जातोय. सत्यजित तांबे यांच्या विजयाचे पोस्टरही पुण्यात लागले आहेत. दरम्यान, मोजणीला सुरुवात होण्याआधी महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. त्यांनीही विजयाचा दावा केला आहे.
Published on: Feb 02, 2023 10:39 AM